युवतीचा वाढदिवस असल्याने 'तो' रुमवर गेला अन् ...
वर्धा:- वर्ध्यात प्रेम प्रकरणातून एक युवकाचा खून आणि युवतीला गंभीर जखमी केल्याची घटना 21 रोजी मध्यरात्री 1.30 ते 2 वाजताच्या सुमारास सावंगी मेघे परिसरातील साईपार्क येथे घडली आहे. मृतकाचे नाव मोहित मोहर्ले (28) रा. मोरवा पडोली जि. चंद्रपूर असून आरोपीचे नाव प्रवीण सोनटक्के आहे. हे तिघेही चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सदर घटना वर्ध्यात खळबळ माजवणारी आहे आणि पोलिस तपास सुरू आहे.
युवतीचा वाढदिवस असल्याने आरोपी प्रवीण सोनटक्के वर्ध्यात आला होता. त्याने युवतीला फोन केला असता, तिने फोन उचलला नाही. त्यामुळे आरोपी युवतीच्या रूमवर गेला असता, तिथे त्याला मोहित मोहुर्ले दिसला. हा प्रसंग पाहून प्रवीणचा राग अनावर झाला. आरोपीने लोखंडी रॉडने मोहित आणि युवतीवर हल्ला केला. यात मोहितचा जागीच मृत्यू झाला, तर युवती गंभीर जखमी झाली. सध्या युवतीवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोपी आणि मृतक चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणीच्या गावातील आहेत. मृतक मोहित तरुणीचा मामे भाऊ असल्याची माहिती आहे. प्रेमसंबंधातून ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. युवतीची सावंगी येथे नर्सिंगच्या एएनएमच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. साई पार्क परिसरातील भाड्याच्या घरात ती राहत होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी प्रवीण सोनटक्के याला ताब्यात घेतले आहे. हत्येचा थरार मध्यरात्री घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.