गडचिरोली:- अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या लेकीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीची 'तुतारी' फुंकण्याचा निर्णय घेतला आहे. निष्ठा पायदळी तुडविवेल्या वडिलांना येत्या विधानसभेला पराभवाची धूळ चारेन, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. भाग्यश्री यांच्या पवार गटातील प्रवेशाने महाराष्ट्राला बाप-लेकीमधला संघर्ष विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची 'शिवस्वराज्य यात्रा' गडचिरोलीत आहे. याच यात्रेत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत भाग्यश्री आत्राम यांनी 'तुतारी' फुंकली. भाग्यश्री यांनी वडिलांच्या भूमिकेविरोधात जाऊन तुतारी फुंकली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत बापलेक आमनेसामने असणार आहेत.