पोंभुर्णा:- शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रपूर जिह्यातील पोंभूर्णा येथे आले होते. यावेळी मंचावर आदिवासी बांधवांनी गोंडी नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी आदिवासी बांधवांबरोबर भास्कर जाधव यांनीही गोंडीनृत्यावर ठेका धरला.
चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून तिकिटासाठी इच्छुक आहेत. त्यांचा दावा मजबूत करण्यासाठी त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पोंभूर्णा शहरात आयोजित करण्यात आला होता. यासाठी ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आमंत्रित करण्यात आले होते. जाधव हे चंद्रपुरात आल्यांनतर ते पोंभूर्णा येथे पोहचले. त्या ठिकाणी जाधवांचा स्वागत समारंभ पार पडला. त्या ठिकाणापासून मेळावा आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणाकडे वाजतगाजत मान्यवरांना नेण्यात येत असताना आदिवासी बांधवांचे गोंडी नृत्याचे सादरीकरण केले. गोंडीनृत्यावर वाजतगाजत जाधवांना सभास्थळी नेत असताना भास्कर जाधवांना रहावले नाही. त्यांनीही नृत्य सादर करण्याऱ्या आदिवासी बांधवांसोबत गोंडीनृत्यावर ठेका धरला.