चंद्रपूर:- मुली, महिलांवरील अत्याचाराचा घटना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. महिला, मुलीच्या सुरक्षेसाठी तसेच समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांच्या महिलांनी एकत्र येत चंद्रपूर जागृती मशाल मंच स्थापन केला.
या माध्यमातून दिनांक 31 ऑगस्टला रोजी रात्री 9:30 वाजता गांधी चौक येथून जटपुरा गेट मार्गे प्रियदर्शनी चौकापर्यंत मशाल मार्च काढण्यात आला. गांधी चौक येथे लोक प्रतिनिधीच्या हस्ते मशाल पेटवित मोर्चाची सुरूवात केली. प्रियदर्शनी चौकात शपथ घेत मोर्चाची सांगता केली. यावेळी राजकीय पक्ष, शैक्षणिक, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते व चंद्रपूरकर उपस्थित होते.