(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- पोलीस स्टेशन सिंदेवाही मध्ये अत्याचार बाबत गुन्हाची नोंद झाली आहे. मुलगा व मुलगी अल्पवयीन आहेत. संबंधित घटनेचा वृतांत पुढील प्रमाणे सिंदेवाहीमध्ये राहणारे दोन अल्पवयीन मुलगा व मुलगी वय १७ वर्ष, दोघेही एकाच वर्गात शिकणारे, एकाच वर्गात शिकत असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली, इथे यांच्या जवळीक पणाला प्रेम नाही म्हणता येणार, त्यांना एकमेकांना बाबत आकर्षण निर्माण झाल आणि या आकर्षण मुळे एका दुसऱ्या बाबत शारीरिक जवळीक निर्माण झाली.
आकर्षणाची जागा वासनेने घेतली व एकमेकांच्या सहमतीमधून शारीरिक वासनेचा खेळ सुरु केला. त्यात भर म्हणजे या वासनेच्या खेळाचे मोबाईल द्वारे व्हिडीओ चित्रीकरण सुद्धा केले. फोटो सुद्धा काढले, नको त्या वयात पॉर्न व्हिडीओ बघून नको ते अश्लील कृत करीत व्हिडीओ बनवीत असतात, आणि ते आपल्या मोबाईल मध्ये संग्रह करून ठेवतात, आणि त्यात भर म्हणजे अश्या व्हिडीओच्या सुरक्षित ची काळजी नं घेता स्वतःला मज्जा मिळावी म्हणून असे व्हिडीओ बनविले जातात, असे वासनेच्या खेळात कारनामे सुरु होते, अचानक पणे ज्या शारीरिक आकर्षणमुळे जवळ आले. त्या मध्ये दोघात दुरावा निर्माण झाला, आणि हा दुरावा मुलाला सहन झाला नसल्याने त्याने आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या दोघांच्या शारीरिक संबंध चे चित्रीकरण स्नॅप चाट या अँप वर अपलोड केले. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्याने मुलीच्या घरच्या व्यक्तीच्या लक्षात आल्यावर तात्काळ पोलीस स्टेशन गाठले, घटनेचे गंभीर्य बघून मुलाला अटक केली, व त्याच्या स्नॅप चाट वर असलेली आय डी तात्काळ ब्लॉक केली पण व्हिडीओ भरपूर व्हायरल झाला होता. मुलगा अल्पवयीन असला तरी त्याच्या वर बलात्कार चा गुन्हा दाखल करून बाल सुधार गृह मध्ये त्याची रवानगी करण्यात आली आहे.
सगळ्यात सांगायचं मुद्दा आई वडील ज्या विश्वासाने मुलांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर पाठवितात ते मुलं आणि मुली आपल्या आई वडिलांच्या विश्वासाचा खून करून मुडदा पाडतात, नको त्या वयात प्रेमाच्या नावाखाली शारीरिक वासनेचे चाळे करीत असतात, पण वेळ निघून गेल्यावर भोगावं लागत ते दोन्ही मुलाच्या आणि मुलीच्या कुटुंबाला, पालकांना सामाजिक बदनामी ला समोर जावं लागत, याची जाणीव या मुला मुलींना कधी होणार? की होणारच नाही. प्रेमाच्या नावाखाली शारीरिक वासनेचा खेळ करणाऱ्या मुला मुलीनी आपल्या कुटुंबाचा तरी एकदा विचार करावा,अल्पवयात मुला मुलींना च्या बाबत कोणतीही अनुचित घटना घडू नये या सिंदेवाही पोलीस स्टेशन चे तात्क. पोलीस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी स्वतः आपले पी एस आय. सागर महल्ले,सहकारी रणधीर मंदारे, मंगेश मातेरे, यांच्या सोबत तालुक्यातील शाळा व महाविद्यालय मध्ये अश्या घटना घडू नये या साठी जनजागृती च्या कार्यशाळा सुद्धा घेतल्या होत्या, अश्या बाबतीत आणखी एका मोठा कार्यक्रम घेऊन शालेय जीवनातील मुलं आणि मुली च्या जीवनात अनुचित घटना घडू नये या प्रयत्नात होते, पण वेगवेगळ्या कामाच्या व्याप्यामध्ये सदर कार्यक्रम करता आला नाही, आणि त्यांची तालुक्या मधून प्रशासकीय बदली झाली.
*✍️ सिंदेवाही तालुका प्रतिनिधी*
*✒️ विरेंद्र का. मेश्राम*
*📞 7507676745, 9763514059*