चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सूचित करण्यात येते की झालेल्या पावसामुळे सर्व नदी , नाले व ओढे भरून वाहत आहेत. तरी आज बैलपोळा सणानिमित्त आपण आपले जनावरे बैल , गाय धुण्याकरिता खोल पाण्यात नेऊ नये. पाणी जर जास्त खोल असेल तर जनावर किंवा संबंधित व्यक्ती बुडण्याची / वाहुन जाण्याची दाट शक्यता असते. तरी सर्वांनी काळजी घ्यावी.
बैलपोळा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर