Police Bharti: पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट समोर....

Bhairav Diwase

मुंबई:- पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बँडस्मन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची रिक्त पदांची माहिती पाठविणे बाबतचे परिपत्रक राजकुमार व्हटकर अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी काढले आहे.



उपरोक्त विषयास अनुसरुन राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गात पोलीस शिपाई, चालक पोलीस शिपाई, बँडस्मन व सशस्त्र पोलीस शिपाई यांची दिनांक 01/01/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती खालील नमुद विहित नमुन्यात या कार्यालयास या कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक, श्री. शंकर कुलकर्णी यांचे ई-ऑफिस वरील Shankar B. Kulkarni OS (SBK) O/O TRAINING-DGPS या युजर आयडीवर कृपया दिनांक 01/10/2024 रोजी दुपारी 12:00 वा. पर्यंत न चुकता पाठवावी. ज्या घटकांची माहिती प्राप्त होणार नाही त्यांची माहिती निरंक समजण्यात येईल. असे परिपत्रकात म्हटले आहे.