चंद्रपूर:- राष्ट्रीय कुणबी महासंघाचं काम (कार्य) संघटन संपूर्ण देशात मजबुत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय कुणबी महासंघाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय कुणबी महासंघामध्ये काम करण्याची इच्छाशक्ती, कुणबी समाजातील काम, सेवाभावी वृत्ती व सामाजिक क्षेत्रात काम करण्याची आवड विचारात घेऊन सौरभ ठोंबरे यांची राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या युवा विंग शहर अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा, या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
काय म्हटले नियुक्ती पत्रात...
राष्ट्रीय कुणबी महासंघ थोर संत संत तुकाराम महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या विचारांनी वाटचाल करणारी संघटना आहे. महापुरूषांचा विचार कुणबी समाजात रूजवून सर्व पोटजातींना एका विचारांनी कुणबी समाजाची संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहाल.
आपण पुढील काळात राष्ट्रीय कुणबी महासंघामध्ये काम करण्याची आवड असणारे व स्वेच्छेने काम करणारे कार्यकर्ते सोबत घेऊन त्यांच्या बरोबर विचार विनिमय करून राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद साधून संघटनेने ठरवून दिलेल्या नियमानुसार काम करून राष्ट्रीय कुणबी महासंघाचे संघटन वाढविण्याचा प्रयत्न करावा. आपल्या कामाचा आढावा वेळच्या वेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाच्या जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय अध्यक्षांना पाठवावा. आपले हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास शुभेच्छा !