Assembly Election : काळ्या पैशाच्या वापराची करता येणार तक्रार

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन आयकर विभागाने केले असून माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे. निवडणुकीदरम्यान काळा पैसा वापरण्यात येत असलेली माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल या बाबत विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी आयकर विभागाला नक्की कळवावे. माहिती देणा-याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.

माहिती देण्यासाठी येथे करा संपर्क :

 1. टोल फ्री क्रमांक : 1800-233-0355 / 1800-233-0356

2. व्हॉटस्ॲप क्रमांक : छायाचित्रे, व्हीडीओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक 9403390980

3. ई-मेल : nagpur.addldit.inv@incometax.gov.in आणि nashik.addldit.inv@incometax.gov.in येथे संपर्क करावा.