मुंबई:- भाजपकडून आज अधिकृतपणे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे. भाजपाकडून यादीत राजुरामधून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वरोरामधून करण देवतळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ब्रम्हपुरीमधून कृष्णा सहारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत बल्लारपूर मधून सुधीर मुनगंटीवार तर चिमूर मधून कीर्तीकुमार भांगडिया यांना आधीच उमेदवारी जाहीर झाली होती. आज भाजपाच्या दुसऱ्या यादीत राजुरामधून देवराव भोंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. वरोरामधून करण देवतळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर ब्रम्हपुरीमधून कृष्णा सहारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चंद्रपूर विधानसभेत भाजपकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. लवकरच नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
✅