BJYM movement : विद्यार्थीनीवरील अत्याचाराविरोधात भाजयुमोचे आंदोलन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- कोरपना येथील एका खाजगी शाळेत शिकणार्‍या 12 वर्षीय विद्यार्थीनीवरील अत्याचाराच्या घटनेचा भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगरच्यावतीने गुरूवार, 3 ऑक्टोबरला येथील गांधी चौकात जाहीर निषेध करीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार, हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थीनीवर अत्याचार करणारा कोरपना शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष असलेला शिक्षक अमोल लोडे याच्या पुतळयाला काळे फासून चप्पल, जोडे मारीत पुतळयाचे दहन केले. बदलापूर घटनेतील आरोपीला ज्या पध्दतीने शिक्षा देण्यात आली त्याचप्रमाणे अमोल लोडे यालादेखील शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.

आंदोलनात चंद्रपूर महानगर भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, महामंत्री गणेश रामगुंडेवार, सतीश तायडे, यश बांगडे, पप्पू बोपचे, सुनील डोंगरे, प्रविण उरकुडे, आदिवासी आघाडी युवती प्रमुख तृष्णा गेडाम, राकेश बोमनवार, अमित निरंजने, कुणाल गुंडावार, पराग मलोडे, पवन ढवळे, मनीष पिपरे आदींसह युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरपन्यातही भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशी बोलून या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा होईल, असा तपास करायला सांगितला आहे.