जिल्हा परिषद सुमठाणा शाळेत शिक्षण नवरात्रोत्सव संपन्न.
राजुरा:- जि.प.उच्च प्रा.शाळा सुमठाणा पंचायत समिती राजुरा येथे शिक्षण नवरात्रोत्सव वर्ष पाचवे मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.ज्यांच्या कर्तुत्वामुळे स्त्रियाना शिक्षण अधिकार मिळाला , समाजात मानाने जगण्याचा अधिकार मिळाला अशा थोर राजमाता जिजाऊ ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर , रमाबाई आंबेडकर अशा गौरवशाली स्रीयाँच्या प्रतिमेचे पूजन नवरात्रीच्या नऊ दिवस करण्यात आले. प्रसंगी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले.डाँ.पायल आस्वले यांनी मोफत मुलांची दंत तपासणी करून मोलाचे सहकार्य केले.तसेच शाळेत विद्यार्थ्यांच्या आजी आजोबांना बोलावून त्यांच्याच नात -नातवांच्या हस्ते आजी आजोबांचा भेटवस्तू देवून कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला.पूणे येथे कार्यरत असलेले आर्मी जवान सन्मा.श्री सुरज कपाळे यांनी मुलांना विशेष मार्गदर्शन केले.माजी.मुख्याध्यापक श्री पहानपटे सर, श्री मटाले सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शाळेत गायन स्पर्धा , निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धाँचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमात शाळेचे मु .अ.डाँ.श्री कोटनाके सर ,श्री बोंडे सर ,श्री मेश्राम सर व श्री पेँटे सर याँनी मोलाचे सहकार्य केले.सदर उपक्रमाचे आयोजन सौ.वैशाली भोयर मँडम यांनी केले.