Deorao bhongle: काँग्रेसचे पुढारी मुग गिळून गप्प का? देवराव भोंगळे यांचा सवाल

Bhairav Diwase
कोरपना:- कोरपना शहरातील युवक काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष अमोल लोढे हा आरोपी 11 वर्षाच्या चिमुकलीवर गेल्या अनेक दिवसांपासून अत्याचार करीत होता. त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. अत्याचार्‍याला वाचविण्याकरिता काँग्रेसचे नेते विविध प्रकारे प्रयत्न करीत होते. पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. त्या गरीब कुटूंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. या नौटंकीबाज काँग्रेस पक्षाने मोर्चा काढून आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे यांच्या शिक्षण संस्थेतसुद्धा असा प्रकार घडला होता. काँग्रेसचे पुढारी मुग गिळून गप्प का? या आरोपीला वाचवण्यामध्ये ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यावरही आता चौकशी करून गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली.