Navnath Aaba Waghmare: ....पण संकट अजून टळलेले नाही

Bhairav Diwase


चंद्रपूर:- 'सगेसोयरे' मुळे केवळ ओबीसी नव्हे, तर एससी,एसटी आरक्षणालाही नुकसान झाले असते. पण ते थांबविण्यात आपण यशस्वी झालो, पण संकट अजून टळलेले नाही. तेव्हा आगामी काळात विधानसभेत १०० पेक्षा जास्त आमदार गेले पाहिजे. केवळ जाऊन नाही, तर बोलणारे ओबीसी नेते हवेत, अशी अपेक्षा नवनाथ आबा वाघमारे यांनी यावेळी व्यक्त केली. मराठवाड्यातील ओबीसीविरोधी २५ आमदारांना या निवडणुकीत ओबीसी समाज घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे ठरविलेले असल्याचे वाघमारे सांगितले.


मराठे नेते जरांगे यांनी पंकजा मुंढे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांना निवडणुकीत हरविण्यासाठी कंबर कसली होती, ते लक्षात ठेवा असा आरोप वाघमारे यांनी केला. १९३१ नुसार ५४ टक्के असलेली ओबीसी संख्या आज ६० टक्के आहे, पण मूठभर मराठे आरक्षणासाठी दबाव टाकताहेत. त्यामुळे जात जनगणना होणे गरजेची आहे, असेही ते म्हणाले.