चंद्रपूर:- महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे 1 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 1 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता मोरवा येथील विमानतळावर आगमन. सकाळी 10.35 वाजता मोरवा विमानतळावरून वन अकादमीकडे प्रयाण, सकाळी 10.55 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव, सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत जिल्ह्यातील विविध मान्यवरांची भेट व चर्चा, दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत राखीव, दुपारी 2 वाजता वन अकादमी येथून पोंभुर्णाकडे प्रयाण, दुपारी 2.45 वाजता पोंभुर्णा येथे आगमन व 3 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्यानिमित्त विविध स्टॉलची पाहणी, दुपारी 3 ते 3.50 वाजेपर्यंत आदिवासी मेळाव्याला उपस्थिती, दुपारी 4 वाजता पोंभुर्णा येथून प्रयाण, संध्याकाळी 4.45 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. रात्री वन अकादमी येथे मुक्काम.
2 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 7.45 वाजता वन अकादमी येथून मोरवा विमानतळ कडे प्रयाण व त्यानंतर हेलिकॉप्टरने प्रयाण...