Sudhir Mungantiwar : 'त्या' आरोपीवर कठोर कारवाईसाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार

Bhairav Diwase


चंद्रपूर:- गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर शाळेमध्ये शिक्षकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना चंद्रपुर जिल्ह्यामध्ये उघडकीस आली होती. या प्रकरणात दोषी असणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवून शिक्षा करणार तसेच त्या शाळेच्या मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीत मुद्दा उपस्थित करणार असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.



चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्यासाठी कॅबिनेटमध्ये मुद्दा उचलणार जाणार आहे. याकरीता गुरुवारी (दि.3) पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. आरोपी शिक्षकांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच शाळेच्या संपूर्ण व्यवस्थापनाला अटक करण्याचे संकेत दिले. आरोपी शिक्षकाकडे गुंगीच्या गोळ्या आल्या कुठून, असा सवाल त्यांनी केला.