beating: ....अन् कराळे मास्तरला मिळाला प्रसाद!

Bhairav Diwase

वर्धा:- जिल्ह्यातील चारही मतदार संघात अतिशय शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता कराळे मास्तर याला उमरी मेघे परिसरात चांगलाच प्रसाद मिळाला.


वर्ध्यामध्ये नितेश कराळे यांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?

वर्ध्याच्या उमरी इथं शरद पवार गट आणि भाजपा कार्यकर्त्यांत राडा झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बुथ लावण्याच्या कारणातून बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाचे दोन्ही गट आमने सामने आल्याने वातावरण तापले आहे. या घटनेची माहिती मिळताच सावंगी पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.