ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, विस्तार अधिकाऱ्याला काळं फासत दिला चोप

Bhairav Diwase

धुळे:-
धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विस्तार अधिकाऱ्याने ग्रामसेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा प्रकार घडलाय. यानंतर संतप्त महिला ग्रामसेविकेने विस्तार अधिकाऱ्याला काळ फासून चांगलाच चोप दिलाय. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी विस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारे याने ग्रामसेविका महिलेचा विनयभंग करून त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती. शिंदखेडा पंचायत समितीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे. 

विस्तार अधिकार्‍याला फासले काळे

यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्‍याला काळे फासत चांगलाच चोप दिलाय. आता शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.