चंद्रपूर:- चंद्रपूर हा जिल्हा आदिवासीबहुल असल्याची अनेकांची समज होती. पण आता या जिल्ह्यात लक्षणीय प्रगती होत आहे. पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि औद्योगिकरणाच्या माध्यमातून आता सबंध महाराष्ट्राचे लक्ष या जिल्ह्याकडे लागून राहिले आहे. मुल एमआयडीसी च्या माध्यमातून प्रचंड मोठ्या औद्योगिक क्रांतीचा पाया रचला जात आहे.
ॲडव्हांटेज चंद्रपूर २०२४ -इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’चे उद्घाटन चंद्रपूरमध्ये झाले. या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रूपसह १९ कंपन्यांशी करार केले गेले आहेत. या सुमारे ७५ हजार ७२१ कोटी रुपयांचा करार करण्यात आले. विशेष म्हणजे इथे ४० हजारहून अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने या करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच या कार्यक्रमात प्रदर्शन देखील भरवण्यात आले.
बल्लारपूरमध्ये तर पूर्वी चांगले रस्तेही नव्हते. आज इथे उत्तम दर्जाचे रस्ते आहेत, सर्वोत्तम पायाभूत सुविधा आहे, औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली आहे आणि तुम्हाला माहिती आहे हे सगळं कोणामुळे झालं. अर्थात आपल्या सुधीर भाऊ मुनगंटिवार यांच्यामुळे... सुधीरभाऊंनी ॲडव्हांटेज चंद्रपूरमध्ये उच्चारलेलं वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो. सुधीरभाऊ म्हणाले, "चंद्रपूर हे आतापर्यंत कोल, सिमेंट यासाठी ओळखले जात होते. आता ते ‘कॅश’ साठी पण ओळखले जाईल. येथे स्थापन झालेले उद्योग भविष्यात भरपूर पैसा कमावतील." म्हणजेच चंद्रपूर हा महाराष्ट्राला पैसे कमावून देणारा जिल्हा होणार आहे. या अर्थाने इथे जणू पैशांची फॅक्टरीच लागणार आहे! यावेळी "देश के निर्माण में, चंद्रपूर मैदान में" अशी महा-घोषणाही सुधीर मुनगंटिवार यांनी दिली आहे.
बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचा गेली १५ वर्ष विकास करणारे सुधीर मुनगंटीवार हे हाती घेतलेल्या पंचसूत्री कार्यक्रमात पुढील पंचवार्षिक नियोजनात उद्योग उभारणीला अधिक महत्व देणार आहेत. अश्यात बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक घरातील किमान एका व्यक्तीला काम मिळणार आहे. म्हणून मतदान करताना विकासाला मतदान करा असे आवाहन महायुतीने केले आहे.