चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयात २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिवस' मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. राज्य शासनाच्या आस्थापना व प्रशासन विभागाच्या परिपत्रकानुसार भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्याबाबत नमूद करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. सर्वप्रथम डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भारतीय संविधानातील मूल्य प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावेत, स्वातंत्र्याच्या मुल्यांसह राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला बहाल केलेल्या अधिकारासह राष्ट्रासाठी कर्तव्याची जाणीव अधिक व्यापक व्हावी यासाठी दरवर्षी 'संविधान दिवस'साजरा करण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. पी.एम.काटकर यांनी दिली.
यावेळी उपप्राचार्य डॉ .स्वप्नील माधमशेट्टीवार, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रमोद शंभरकर यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी आभार प्रदर्शन डॉ प्रकाश बोरकर यांनी केले.
दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाला शुभेच्छा दिल्यात.