Suicide News: शिक्षकाने पत्नी, मुलीसह रेल्वेखाली संपवले जीवन!

Bhairav Diwase

परभणी:- परभणीच्या गंगाखेड शहरालगत असलेल्या धारखेड परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोदावरी नदी पुलाच्या रेल्वे ट्रॅकवर एका शिक्षकाच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मसनाजी सुभाष चुडमे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते गंगाखेड शहरातील ममता माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदावर कार्यरत होते. मसनाजी यांनी त्यांच्या पत्नी आणि मुलीसह स्वतःला रेल्वे ट्रॅकखाली झोकून देले आणि कुटुंबाची जीवनयात्रा संपविली.

शिक्षक मसनाजी चुडमे, पत्नी रंजना मसनाजी चुडमे आणि मुलगी अंजली यांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकजवळ आढळले. परळीकडे कोळसा घेऊन जात असलेल्या रेल्वेखाली स्वतःला झोकवून देत आत्महत्या केलीय. गंगाखेडपासून काही अंतरावर असलेल्या धारखेड शिवारातील ही घटना घडली आहे.

सदर शिक्षक कुटुंब हे अहमदपूर तालुक्यातील कीन्ही गावातील असल्याची माहिती आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे. या कुटुंबाने आत्महत्या का केली? हे अद्याप समजू शकली नाहीये. रेल्वे पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.