चंद्रपूर:- जिल्ह्यातील सावली तालुक्यातल्या बोथली- हिरापूर रोड वरील मार्कंडेय विद्यालयासमोर झालेल्या अपघातात 3 युवक ठार झाले. शेतकरी शेतातून काम करून ट्रॅक्टर रोडच्या कडेला लावून लाईट सुरू ठेवून एका सहकाऱ्याची वाट बघत होता. अचानक केटीएम कंपनीच्या दुचाकीवर तिघे जण भरधाव वेगाने जात असतानाच दुचाकी स्वाराचे संतुलन सुटले आणि त्याने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की हर्षद दंडावार याचा जागीच मृत्यू झाला. तर साहील कोसमशीले व बाईकवर असलेला तळोदी येथील त्यांचा मित्र साहिल गणेशकर गंभीर जखमी झाले. त्या दोघांना गडचिरोलीच्या रुग्णालयात नेताना साहिल चा वाटेतच मृत्यू झाला.तर कोसनशिले या युवकाचा उपचारांअंती मृत्यू झाला. तीनही युवक हिरापूर येथे नाटक पाहण्यासाठी जात असल्याचे समजते. अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.