Sudhir mungantiwar: आमदारकीची शपथ घेण्याआधीच सुधीर मुनगंटीवार यांची आश्वासनपूर्ती!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- "दिला शब्द केला पूर्ण" या वाक्यासाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणुकीत दिलेले शब्द पूर्ण करण्याकरिता सुरुवातही केली आहे. विशेष म्हणजे नव्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आमदारकीची शपथ घेण्याच्या आधीच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूल येथे शासकीय पॉलीटेक्निक काॅलेज सुरू करण्यासंदर्भात त्यांनी कार्यवाही सुरू केली.
काल मुनगंटीवार यांनी मुंबई येथे तंत्रशिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूल येथे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने करण्याचे निर्देश दिले. यावेळी या अधिकाऱ्यांनी मुल येथे पॉलिटेक्निक कॉलेज सुरू करण्यास काहीही अडचण जाणार नाही यासाठी सुधीर मुनगंटीवार यांना आश्वस्त केले.

राजकारणात मतासाठी केवळ आश्वासने दिली जातात. मात्र सुधीर मुनगंटीवार हे असे व्यक्तिमत्व आहे की, एकदा शब्द दिले की, ते पूर्ण करतात याचीच प्रचिती आज पुन्हा पॉलीटेक्निक कॉलेजच्या निमित्ताने आली आहे.

मूल येथे शासकीय पॉलीटेक्निक झाल्यास मूलसह पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही व चंद्रपूर जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनीना लाभ होणार आहे. मूल येथे यापूर्वीच, शासकीय कृषी महाविद्यालय सुरू झाल्याने शहरात शैक्षणिक विकासात मोलाचे योगदान मिळाले आहे. शासकीय पाॅलिटेक्निक सुरू झाल्यास मूल हे शिक्षणासाठी माईलस्टोन ठरणार आहे.