Udaan academy: उड़ान अकॅडमीने शहरातून काढली मतदान जनजागृती रॅली

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील अग्रेसर असणारी अकॅडमी म्हणजे उड़ान अकॅडमी... उड़ान अकॅडमी नवनविन उपक्रम राबवित असते. दि. 20 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी दि. 16 नोव्हेंबर ला दुपारी 4 वाजताच्या सुमारास मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.


उड़ान अकॅडमी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थ्यातर्फे मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. मतदार जनजागृती रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. या रॅलीची सुरुवात उड़ान अभ्यासिका चंद्रपूर ते एसटी वर्कशॉप ते वाहतूक विभाग ते उड़ान अकॅडमी चंद्रपूर पर्यंत रॅली काढण्यात आली... रॅलीचे आयोजन उड़ान अकॅडमीचे संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे यांच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी उड़ान अकॅडमीचे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

चला मतदान करूया, लोकशाही रुजवू या., नवे वारे नवी दिशा, मतदानच आहे उद्याची दिशा., आपले मत आपले भविष्य., मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो अशा आशयाची विविध फलक घेऊन विद्यार्थ्यांमार्फत येणाऱ्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली. सदरच्या रॅलीमध्ये मतदारांना मतदान करण्यासाठी अतिशय चांगल्या घोषणा देण्यात आल्या.