Uddhav Thackeray: ऐन विधानसभा निवडणुकीत 5 नेत्यांची उद्धव ठाकरेंकडून हकालपट्टी

Bhairav Diwase

मुंबई:- ऐन विधानसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात निलंबनाची कारवाई झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी पाच नेत्यांना निलंबित केलंल आहे. माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पक्षविरोधी कारवाया केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख रुपेश म्हात्रे यांची पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.


यवतमाळ जिल्ह्यातील विश्वास नांदेकर – जिल्हाप्रमुख वणी विधानसभा, चंद्रकांत घुगूल झरी तालुकाप्रमुख, संजय आवारी – मारेगाव तालुकाप्रमुख, प्रसाद ठाकरे वणी तालुकाप्रमुख यांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून ही माहिती देण्यात आली.

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून रुपेश म्हात्रे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघात बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी त्यांनी अर्ज मागे घेतलं. मात्र अर्ज मागे घेतल्यानंतर सुद्धा पक्ष विरोधी वक्तव्य केली आणि पक्ष विरोधी कारवाया केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.