Vijay waddettiwar : मनोहर पोरेटी एका सच्चा कार्यकर्त्याची निवड

Bhairav Diwase


गडचिरोली:- गडचिरोली विधानसभेकरिता मनोहर पोरेटी यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाने सच्चा कार्यकर्ता निवडला असून त्यांच्या विजयासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता जनसागर उसळला होता.




यावेळी जनता काँग्रेसच्या उमेदवाराला नक्की विजयी करेल, असा विश्‍वास आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेण्यात आलेल्या पत्रपरिषदेतून व्यक्त केला आहे. या पत्रपरिषदेला खासदार डॉ. नामदेव किरसान, उमेदवार मनोहर पाटील पोरेटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, ललित बरच्छा, राजेश कात्रटवार, समशेर पठाण, बंडोपंत मल्लेलवार, कविता मोहरकर आदी उपस्थिती होते.



पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसने अगदी सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिली असून पोरेटी यांच्या विजयासाठी जनता रस्त्यावर उतरेल. यावेळी सुद्धा जनतेचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूनेच आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. महाविकास युती सरकारच्या कारभाराला जनता आता कंटाळली असून या सरकारला धडा शिकविणार आहे. हे सरकार बहुजनांच्या हिताचे नसून सर्वसामान्यांवर अन्याय करणारे सरकार आहे. त्यामुळे या सरकारला खाली खेचण्याचा अधिकार जनतेला आहे. पक्षात कुठलीही गटबाजी नसून बंडखोरांना लवकरच शांत केले जाईल. जे पक्षाच्या विरोधात जातील त्यांच्या विरोधात नक्कीच कारवाई होईल. पोरेटी यांचा विजय सुनिश्‍चित आहे. जनता त्यांच्या पाठीशी आहे, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.