Viral video: शिवानी वडेट्टीवार यांच्या ‘त्या" व्हिडीओने कॉंग्रेसचे नवे उमेदवार अडचणीत!

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी मतदार संघातील कॉंग्रेसचे उमेदवार, राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे प्रचारासाठी त्यांची मुलगी, शिवाणी विजय वडेट्टीवार हि मैदानात उतरली आहे मात्र शिवानी वडेट्टीवार यांचा भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमात सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, शिवाणी वडेट्टीवार यांची भाषणातील भाषेवरून सर्वत्र त्यांचेवर टिका केली जात आहे. त्यांनी भाषणात सांगीतले कि, ”पहिल्यांदा झालेला आमदार फक्त शिकायलाच पाच—दहा वर्ष लागतील. काम काय करायचा, निधी कुठून आणायचा? कसा आणायचा? हे शिकायलाच त्याला दहा वर्ष लागतील”

उल्लेखनीय म्हणजे, बल्लारपूर मतदार संघातून कॉंग्रेसने संतोष रावत यांना, चंद्रपूरातून प्रविण पडवेकर यांना, चिमूर मधून सतिश वारजुरकर यांना तर वरोरातून प्रविण काकडे यांना पहिल्यांदाच उमेदवारी दिली आहे. शिवाणी वडेट्टीवार यांचे भाषणाचा संदर्भ घेतला तर, हे चारही कॉंग्रेसचे उमेदवार विकास करू शकणार नाही कारण, काम काय करायचे? निधी कुठून आणायचा? कसा आणायचा? हे शिकायला त्यांना दहा वर्ष लागेल. स्वत:चे वडिलांना निवडूण आणण्याकरीता, प्रचार करतांना, आपण आपल्याच पक्षाच्या इतर उमेदवारांच्या विरोधात भूमिका मांडीत आहोत, याची साधी कल्पनाही त्यांना नसावी काय? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. उल्लेखनीय म्हणजे सहा महिण्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत शिवाणी वडेट्टीवार यांनी लोकसभेत खासदारकीची उमेदवारी मागीतली होती. म्हणजे त्याही पहिल्यांदाच खासदार बनणार होत्या, मग त्या विकास करणार नव्हत्या काय? असा प्रश्न आता मतदार विचारीत आहे.

आजचा विरोधी पक्ष नेता हा उद्याचा मुख्यमंत्री असतो असे सांगत, त्यांनी विजय वडेट्टीवार हे मुख्यमंत्री बनतील असा आशावाद मतदाराना दाखवित असल्यांचे व्हिडीओत दिसत आहे. 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सत्तेत येण्यापूर्वी विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेतेच होते मात्र मंत्रीमंडळ वाटपात आपल्याला ‘कमी दर्जाचे मंत्रीपद’ दिल्यांचे सांगून अनेक दिवस मंत्रीपदाची शपथ घेतली नव्हती हे विशेष!
शिवाणी वडेट्टीवार यांचे वादग्रस्त व्हिडीओत, वीज गेल्यावरून, महावितरण कर्मचार्यांना अतिशय खालच्या भाषेत शिवीगाळ केली, यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांत, मजूरांत रोष निर्माण होवून त्याचा फटका विजय वडेट्टीवार यांना बसेल अशी मतदारात चर्चा आहे.