चंद्रपूर:- शहरातील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, काष्ठशिल्पकार, व्यंगचित्रकार श्री मनोहर सप्रे सर यांच्या दुःखद निधनाने एक तेजस्वी विचारवंत आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. वयाच्या 92 व्या वर्षी, सरकार नगर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सप्रे सर राजकीय, सामाजिक, कला आणि साहित्य क्षेत्रांतही सक्रिय होते. त्यांनी काष्ठशिल्पकलेच्या माध्यमातून निसर्ग आणि पर्यावरण यांची जाणीव प्रबळ केली. जंगलाची विशेष आवड असलेल्या सप्रे सरांशी निसर्ग आणि पर्यावरण विषयांवर सतत संवाद व्हायचा. त्यांच्या सल्ल्यामुळे अनेक नाविन्यपूर्ण कल्पना आकारास आल्या.
साहित्य, पत्रकारिता, व्यंगचित्र, शिल्पकला आणि विचारवंत म्हणून त्यांनी विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून येणारी नाही.