भद्रावती (जितेंद्र माहुरे भद्रावती प्रतिनिधी):- जिल्ह्यातील भद्रावतीत विवेकानंद महाविद्यालयात, चंद्रपुर जिल्हा अजिंक्यपद वरिष्ठ गट पुरुष व महिला स्पर्धा व निवड चाचणी सामने द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आले असता, या स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकुण 7 खो-खो क्रीडा मंडळानी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ,भद्रावती, नव क्रांतिज्योत क्रीडा मंडळ, चंद्रपुर,तालुका क्रीडा संकुल, वरोरा, संभाजी क्रीडा मंडळ, वरोरा,आनंद वन स्पोर्ट्स हब, वरोरा, युवा क्रीडा मंडळ, चंद्रपुर, ज्ञान ज्योती क्रीडा मंडळ, नवरगाव या दरम्यान स्पर्धा वेळी अंतिम सामन्यात द्रोणाचार्य क्रीडा व सांस्कृतिक मंडळ भद्रावती पुरुष संघाने नव क्रांतिज्योत क्रीडा मंडळ चंद्रपुर या पुरुष संघावर 20-18 असा 2 गुणांनी विजयी झाला. तर महिलांच्या अंतिम सामन्यात नव क्रांतिज्योत क्रीडा मंडळ चंद्रपुर या संघाने तालुका क्रीडा संकुल वरोरा या संघावर 11-8 असा 3 गुणांनी विजयी मिळविला. संपन्न झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतुन चंद्रपुर जिल्हा पुरुष व महिला या दोन्ही संघाची राज्यस्तरीय खो -खो स्पर्धेकरिता निवड करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थित चंद्रपुर जिल्हा खो-खो असोसिएशन चे सचिव अशोक मोरे ,प्रा. संगिता बांबोडे, प्रा. डॉ. यशवंत घुमे, दिनेश कोयचाडे , अनिल नरुले , दिपक ठाकरे, दलित बदखल, योगेश मेनेवार, संतोष निंबाळकर , युवराज भारती , विनोद कावटे , भुषण बावणे , दिपक कावटे , सौ योगिता शिंदे, सुचिता ढेंगळे, माधुरी अवघडे मान्यवर उपस्थित होते.