Chandrapur Death News: अखेर...! युगलचा मृतदेह सापडला

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर तालुक्यातील धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडाले. यात एका मुलीला वाचविण्यात तरुणांना यश आले मात्र दोन तरुणींचा मृत्यू झाला असून हि घटना आज दि. 15 डिसेंबरला सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास घडली.


मृतकाचे नाव संध्या शिंदे रा. वणी ता. जिवती (वय 20 वर्षे) असे आहे तर युगल नागापुरे रा. सोनापूर देशपांडे ता. गोडपिंपरी (वय 19 वर्षे) आहे. यामध्ये समिक्षा शेंडे रा. बाबूपेठ (वय 20 वर्षे) हिला तरुणांच्या मदतीने वाचविण्यात यश आले.




नेमकं काय घडलं?

आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूर चे संचालक आदर्श चिवंडे हे आपल्या 36 विद्यार्थ्यांना घेऊन धानोरा-भोयेगाव मार्गावरील वर्धा नदीवर व्यायाम करण्यासाठी आणले होते. व्यायाम झाल्यानंतर काही मुल-मुली पाण्यात उतरले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली बुडाल्या. एका तरुणाने मुलीला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली मात्र तोही बुडाला. जवळ असलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने एका मुलीला वाचविण्यात यश आले. तर एका मुलीचा मृतदेह विद्यार्थ्यांनी पाण्यातून बाहेर काढला. काल शोध मोहीम नंतरही युगलचा मृतदेह सापडला नव्हता. रात्रौ झाल्याने शोध मोहीम थांबवली होती. आज पुन्हा शोध मोहीमेला सुरूवात केली असता दुपारी एक वाजताच्या सुमारास मृतदेह सापडला. काल संध्या शिंदे हिचे तर आज युगलच शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास घुग्घुस पोलीस करीत आहेत.