चंद्रपूर:- पोलीस स्टेशन मुल गु.र.नं ५१२/२०२४ कलम १०३(१),३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल खुनाचे गुन्ह्यातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून दि.२७/१२/२०२४ रोजी गुन्हा घडले पासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपींचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्ह्यात घेत असतांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान, वय २० वर्षे रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता. मुल.जि. चंद्रपूर, त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे, वय २२ वर्षे, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास दि. २८/१२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल विभाग यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Also Read:- चाकूने सपासप वार करून तरुणाची हत्या
नेमकं काय घडलं?
चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शहरामध्ये 28 वर्षीय रितिक अनिल शेंडे नामक युवक पंचायत समिती जवळ असलेल्या नगर परिषदने बनवलेल्या बस स्टॅन्ड च्या बाजूला दुचाकी ठेऊन मोबाईल वर बोलत असतांना 3 जण येऊन रितिक वर चाकूने छातीवर आणि कमरेवर सपासप वार करून रक्त बंबाळ केले. तो खाली कोसळला. मारेकरी यावरच थांबले नाही. रस्त्यानी जात असलेल्या लोकांना चाकू समोर करून धमकावत होते. "चलो जावो नही तो तुम्हे भी खत्म कर देंगे" म्हणून चेतावणी दिले. भीतीने तिथे हजर असलेले लोक तहसील ऑफिस च्या गेट मध्ये गेले. घटनास्थळवरून मारेकरी पसार झाले.
या घटनेची माहिती संदीप आगडे यांना होताच ते आपल्या मित्रासह येऊन रितिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले.