पाटणा पायरेट्स विरुद्ध हरियाणा स्टिलर्स काल दोन सेमीफायनलचे सामने रंगले होते. यामध्ये आता प्रो कबड्डीच्या अकराव्या सीझनचे दोन फायनलमध्ये खेळणारे संघ ठरले आहेत. यामध्ये आता प्रो कबड्डी सिझन ११ च्या फायनलमध्ये पाटणा पायरेट्स आणि हरियाणा स्टिलर्स हे २९ डिसेंबर रोजी एकमेकांशी भिडणार आहेत.
काल हरियाणा स्टीलर्स विरुद्ध युपी योद्धा यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना रंगला होता. तर दुसरा सामना दबंग दिल्ली विरुद्ध पाटणा पायरेट्स यांच्यामध्ये झाला. यामध्ये युपी योद्धाला हरियाणा स्टीलर्सने २८-२५ असे पराभूत केले तर पाटणा पायरेट्सने दबंग दिल्लीला ३२-२८ असे पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत रविवारी त्यांची गाठ गतउपविजेत्या हरियाणा स्टिलर्सशी पडेल.