चंद्रपूर:- गेल्या २ वर्षांपासून CSTPS येथील M/S S.V. enterprises या अस्थापनेत कंत्राटी राजकुमार जुनघरे, नितेश दानव, रमेश भोंगरे, रामेश्वर खोब्रागडे,प्राणतोष इजारदार हे तेथील युनिट नंबर ३, ८ व ९ मध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहेत. परंतु गेल्या २ वर्षांपासून या पाच ही कामगारांचे फेस बायोमेट्रिक प्रणाली मध्ये नोंद केलेली नाही आणी किमान वेतन व भत्ते याचा लाभ त्यांना मिळालेला नाही. तथा १ एप्रिल २०२४ पासून मूळ वेतनत झालेल्या १९% वाढीचा थकबाकी एरियस २०२३ ते २०२४ चे थकबाकी बोनस या बाबी पासून वंचित ठेवण्यात आले.
हे सर्व प्रकरण आज दि. २६ मार्च ला राष्ट्रीय बजरंग दल जिल्हाध्यक्ष चंद्रपूर श्री. रोशन राठोड आणि सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. अंकीत जोगी यांना कंत्राटी कामगारांन द्वारे सांगण्यात आले. कंत्राटी कामगारांच्या समस्या जाणून घेऊन अखेर मा. अप्पर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हाधिकारी साहेब यांना कामगारांना सोबत घेऊन निवेदन देण्यात आले व चर्चा करण्यात आली. व कामगारांना न्याय मिळवून द्या अन्यथा कामगार आणि कामगारांच्या कुटुंबियांन सोबत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.