गडचिरोली:- गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या मा. प्राचार्य, मा. विभागप्रमुख पदव्युत्तर शैक्षणिक विभाग तथा सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र २०२४-२५ मधील उन्हाळी २०२५ च्या सर्व अभ्यासक्रमांच्या सर्व परीक्षा दिनांक २१ एप्रिल, २०२५ रोजी पासून सुरु करण्यात येत आहे.
सदर परीक्षा विद्यापीठाच्या प्रचलित पध्दती प्रमाणे (Offline descriptive mode with regular university pattern) नुसार विद्यापीठाने नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. उन्हाळी २०२५ च्या परीक्ष्याचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशित करण्यात येईल.