गडचिरोली:- नववर्षाच्या पूर्वसंध्येला भामरागड तालुक्यातील मौजा जुवी येथील रहिवासी पुसू गिबा पुंगाटी, वय- 60 वर्ष, व्यवसाय - शेती,  यांचा अज्ञात व्यक्तींनी गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे.  घटनास्थळी कोणत्याही प्रकारचे नक्षल पत्रक किंवा बॅनर आढळले नाहीत.  मृतदेह भामरागड येथील रुग्णालयात आणण्यात आला आहे. 
पुसू गिबा पुंगाटी यांची हत्या माओवाद्यांकडून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, घटनेचा सविस्तर तपास करून पुसू गिबा पुंगाटी यांची हत्या माओवाद्यांनी केली आहे किंवा कसे याबाबत अधिकची पडताळणी गडचिरोली पोलिसांकडून केली जात आहे.  याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पोस्टे धोडराज येथे  सुरू आहे
 


