प्राप्त तक्रारीवरून दि. २६/०३/२०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार, तहसील कार्यालय बल्लारपूर (वर्ग १) यांनी दिलेल्या प्रोत्साहनावरून आलोसे सचिन रघुनाथ पुकळे, तलाठी कवडनई साना, ता. बल्लारपूर जि. चंद्रपूर (वर्ग ३) यांनी तक्रारदार यांना तडजोडी अंती ९० हजार रू. मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवीली, त्यावरून आज दि. ०१/०४/२०२५ रोजी सापळा कारवाई करीता तक्रारदा यांना आलोसे अभय गायकवाड यांचेकडे पाठविण्यात आले असता त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यावरून आज दिनांक ०१/०४/२०२५ रोजी पो.स्टे. बल्लारशाह, जि. चंद्रपूर येथे आरोपी लोकसेवक यांचे विरूध्द गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरु असुन आलोसे अभय अर्जुन गायकवाड, तहसीलदार याना ताब्यात घेण्यात आले असुन आलोसे सचिन रघुनाथ पुकळे हे रजेवर असल्याने शोध पथक रवाना करण्यात आले.
सदरची कार्यवाही ही डॉ. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, श्री. संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, श्री. सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र.वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टाफ पो. हवा. रोशन चांदेकर, हिवराज नेवारे, पो.अं. अमोल सिडाम, प्रदिप ताडाम व चापोशि सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी किवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.