चंद्रपूर:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यावर चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका कंपनीकडून विक्रांत सहारे यांनी ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
सहारे यांनी कंपनीवर अल्पवयीन मुलांना कामावर ठेवण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा आरोप केला होता आणि कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्याची आणि पत्रकार परिषद घेण्याची धमकी दिली होती. त्या कंपनीने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्याच्या आधारे विक्रांत सहारे याचे विरुद्ध खंडणी चा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
विक्रांत सहारे यांच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे पोलिसांकडून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
नागरीकांना आवाहन
याद्वारे जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कंपन्यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही इसम कंपन्यांच्या कायदेशीर कामकाजात बेकायदेशीर अडथळा निर्माण करत असेल, खंडणी मागत असेल तर त्याबाबत तात्काळ पोलीस प्रशासनाला संपर्क साधुन तक्रार दयावी, संबंधीतांविरुध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.