मुंबई:- विधिमंडळाच्या महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना डबल गिफ्ट मिळाले.
नाना पटोले, नितीन राऊत, विश्वजित कदम यांच्यापैकी एकाला लोकलेखा समितीचे अध्यक्षपद दिले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेस श्रेष्ठींच्या वतीने वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि पक्षातर्फे त्यांचे नाव विधानसभा अध्यक्षांकडे पाठविण्यात आले. प्रत्येक पक्षाकडून कोट्यानुसार विधिमंडळ समित्यांसाठी नावे पाठविली जातात.
असे असते समितीचे काम
राज्य सरकारच्या विविध खात्यांचे अंकेक्षण महालेखाकार करतात. त्याचा अहवाल विधिमंडळात सादर केला जातं या अहवालाची छाननी करणे, संबंधितांच्या साक्षी नोंदविणे आणि अहवालातील अनियमिततांवर बोट ठेवत सरकारकडे शिफारशी करणे असे लोकलेखा समितीचे काम असते.