जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गटाचे मानले जाणारे हरीश शर्मा यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. त्यांच्या या निवडीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या ग्रामीण पातळीवरील संघटनात्मक कामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हरीश शर्मा यांची यापूर्वीही जिल्हाध्यक्षपदी निवड झाली होती आणि त्यांच्या कामाची दखल घेऊनच पक्ष नेतृत्वाने त्यांना पुन्हा ही जबाबदारी सोपवली आहे. या निवडीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मुनगंटीवार गटाचे वर्चस्व आणखी एकदा अधोरेखित झाले आहे. पुढील काळात हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात भाजप ग्रामीण संघटना कशा प्रकारे काम करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.