मुंबई:- राज्यातील वाढती बेरोजगारी आणि युवकांची संपणारी वयोमर्यादा लक्षात घेता, आगामी महाराष्ट्र पोलिस शिपाई भरतीत वयोमर्यादा वाढवावी, या मागणीसाठी डिगडोह नगरपरिषद क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्ते सतीश काळे यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.
याप्रसंगी त्यांनी सांगितलं की, राज्यातील हजारो युवक पोलिस भरतीसाठी तयारी करीत असून भरती लांबणीवर गेल्यामुळे त्यांची वयोमर्यादा पार होत आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करून वयोमर्यादेत वाढ करावी, अशी तीव्र मागणी आहे.
हे निवेदन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री सुनील केदार, खासदार श्यामकुमार बर्वे, नागपूर ग्रामीण काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टनकर, माजी जि.प.सदस्य संजय जगताप, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस यांच्या मार्गदर्शनात सादर करण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते रंजीत पाटील, प्रदीप महंत, सोनू तिवारी, सुनील नायडू, नितीन चौधरी, ताजू हुसेन, दिनेश आठवले, लखन सिंह, दिगांबर देशभ्रतार, बादल मनोहरे, समाधान ऊगावकर, विलास बावणे, नितेश रामटेके, सुधीर मोटघरे, निलेश वंजारी, अनिल यादव, जय मिश्रा, भूपेन पडाळकर, सचिन कातोरे, वैभव पवार, संतोष वरठी, रणधीर पांडे व डिगडोह नगरपरिषद हिंगणा विधानसभा कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व संबंधितांनी शासनाकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निवेदनातून आवाहन केले आहे.