Korpana News : नारंडा येथे संजय गांधी निराधार योजनेचे शिबिर संपन्न

Bhairav Diwase

कोरपना:- कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत नारंडा येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकारातून संजय गांधी निराधार योजनेचे कोरपना तहसील कार्यालयामार्फत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले.


सदर शिबिर हे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ज्या समस्या उद्भवत आहे त्या समस्येचे निराकरण करण्यासाठी आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करणे, ईकेवायसी करणे, ज्या लाभार्थ्यांनी आपले ऑनलाईन हयातीचा दाखला तहसील कार्यालय येथे सादर नसेल केला त्या लाभार्थ्यांकडून ऑनलाइन आहे तिचे दाखले स्वीकारणे, अद्यावत आधार कार्ड व बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्राची पूर्तता लाभार्थ्यांकडून करून घेण्यात आली, यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांचे अनुदान किती महिने गेलेले आहे व किती महिने प्रलंबित आहे याची सुद्धा माहिती व्यक्तिशः लाभार्थ्यांना देण्यात आली. सदर योजनेच्या शिबिरामुळे अनेक लाभार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण झाले.


यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, नारंडा ग्रामपंचायतचे उपसरपंच बाळा पावडे,लोणी ग्रामपंचायतचे उपसरपंच अविनाश वाभिटकर, तलाठी राजकुमार अहिरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,संजय गांधी निराधार योजना कार्यालयाचे स्वप्नील बल्की,सेतू संचालक दत्ता बावणे,वैभव डवरे,रुपेश पानघाटे,मारोती शेंडे,भिकाजी घुगुल,आशिष ढुमणे,हर्षल चामाटे, अंगणवाडी शिक्षिका रूपाली भोंगळे,कमल पोटदुखे,शारदा शेंडे,पूजा कुचनकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी सदर शिबिराचा लाभ नारंडा,अंतरगाव,लोणी,पिपरी व वनोजा येथील लाभार्थ्यांनी घेतला.