चंद्रपूर:- गणेश चतुर्थीच्या मंगलमय पर्वावर आमदार करण देवतळे यांच्या निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाली. संपूर्ण परिवारासह त्यांनी शास्त्रोक्त विधी-विधानाने गणेशाचे पूजन-अर्चा केले. बाप्पाच्या आगमनाने घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा नांदत असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी आ. करण देवतळे यांनी श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना केली की, सुख-समृद्धी, आरोग्य, धनधान्य आणि आनंदाची भरभराट प्रत्येकाच्या जीवनात नांदो. गणेशोत्सवाच्या या पावन पर्वावर त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.
घरामध्ये पारंपारिक पद्धतीने गणेशाचे स्वागत करण्यात आले. यावेळी कुटुंबीयांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.