चंद्रपूर:- चंद्रपूरमध्ये उड़ान अकॅडमीच्या 7 व्या वर्धापनदिनानिमित्त आज रामबाग मैदान येथे वृक्षारोपण करण्यात आले. उड़ान अकॅडमीचे संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे सर यांच्या उपस्थितीत हे वृक्षारोपण पार पडले. यावेळी अकॅडमीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
उड़ान अकॅडमी, शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमीच अग्रेसर असते. अकॅडमीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर, मतदान जनजागृती, थोर महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी, तसेच दसरा आणि दिवाळीसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात.
यावेळी गणेश चौधरी, भैरव दिवसे, पवन बोबडे, हर्षल गाडगे, मयुर ढेकले, साहिल कन्नाके, मानसी मुनगेलवार, अल्पीया राऊत या विद्यार्थ्यांसह अनेकजण उपस्थित होते.