पोंभुर्णा तालुका: भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाची धुरा अजय मस्के यांच्याकडे!

Bhairav Diwase


पोंभूर्णा:- महाराष्ट्राचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या सूचनेनुसार, पोंभूर्णा मंडलाचे अध्यक्ष हरिश ढवस यांनी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अजय मस्के यांची नियुक्ती केली आहे.


या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात युवा नेतृत्वाला संधी मिळाली आहे, आणि अजय मस्के यांच्या खांद्यावर पोंभूर्णा तालुक्यात भाजपा युवा मोर्चाला अधिक बळकट करण्याची जबाबदारी आली आहे. मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे पक्षाला युवा वर्गापर्यंत पोहोचण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.