Ballarpur Assembly: बल्लारपूर विधानसभेतील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांकडून महामंत्री व आघाडी अध्यक्षांची घोषणा

Bhairav Diwase


बल्लारपूर:- महाराष्ट्राचे लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील नवनियुक्त भाजपा मंडल अध्यक्षांनी आपापल्या मंडलातील तालुका महामंत्री व आघाडीच्या अध्यक्षांची घोषणा केली आहे.


बल्लारपूर शहर मंडल: बल्लारपुर मंडलाचे अध्यक्ष ॲड. रणजंय सिंह यांनी संघटन महामंत्री म्हणून मनीष पांडे व महामंत्रीपदी सतीश कनकम, देवेंद्र वाटकर, घनश्याम बुरडकर यांची तर युवा मोर्चा अध्यक्षपदी मिथलेश खेंगर व महीला आघाडी अध्यक्षा वैशाली जोशी यांची घोषणा केली.


बल्लारपूर ग्रामीण: बल्लारपूर ग्रामीणचे चंद्रकांत देऊळकर यांनी महामंत्रीपदी सुनील फरकडे, श्रावण सातपुते, गणेश टोंगे, रुमदेव देरकर तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी संदीप पोडे, महीला आघाडी अध्यक्षपदी वैशाली बुद्धलवार यांची घोषणा केली आहे.


पोंभूर्णा मंडल: पोंभूर्णा मंडलांचे अध्यक्ष हरिश ढवस यांनी महामंत्रीपदी विनोद देशमुख, ज्योती बुरांडे, गुरुदास पिपरे तसेच युवा मोर्चा अध्यक्षपदी अजय मस्के, महीला आघाडी अध्यक्षपदी वैशाली बोलमवार यांची घोषणा केली आहे.


मुल ग्रामीण मंडल: मुल ग्रामीण चे अध्यक्ष चंदुभाऊ मारगोनवार यानी महामंत्री पदी संजय येनुरकर, बंडु नर्मलवार डॉ. गुरुदास भेंडारे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी श्रीधर पाकमोडे, महिला आघाड़ी अध्यक्ष पदी अर्चना बल्लावार यांची घोषणा केली आहे.

चंद्रपुर तालुका: चंद्रपुर तालुका अध्यक्ष श्रीनिवास जनगम यांनी महामंत्री पदी शांताराम चौखे, संजय यादव, अमोल जगताप, तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी नागेश कडूकर महिला आघाड़ी अध्यक्ष पदी अनिता भोयर यांची घोषणा केली आहे.

मुल शहर: मुल शहर अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले यांनी महामंत्री पदी प्रशांत बोबाटे, दादाजी येरणे, जितेंद्र टिंगसुले तसेच युवा मोर्चा अध्यक्ष पदी पंकज लाडवे महिला आघाडी अध्यक्ष पदी मनिषा गांडलेवार यांची घोषणा केली आहे.


या घोषणेनंतर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी आ. सुधीरभाऊंच्या निर्देशनात येत्या दोन दिवसात संपूर्ण मंडल कार्यकारिणी व उर्वरित आघाडी व प्रकोष्ठ चे अध्यक्ष /महामंत्रींची घोषणा करावी असे निर्देश दिले आहे.


नवनियुक्त महामंत्री व आघाडी अध्यक्षांचे अभिनंदन व आगामी संगठनात्मक कार्यांसाठी शुभेच्छा महाराष्ट्राचे लोकनेते व माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यानी दिल्या.

वरिल नवनियुक्तीचे स्वागत व अभिनंदन केंद्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजभैया अहीर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जेष्ठनेते चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले, प्रदेश सचिव सौ.विद्याताई देवाडकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सौ. रेणुकाताई दुधे, महिला आघाडी प्रदेश महामंत्री कु. अल्काताई आत्राम, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाड़े, श्री. विवेक बोढे, रामपाल सिंह, माजी नगराध्यक्षा सौ. रत्नमालाताई भोयर, पोंभुर्णा नगर पंचायत अध्यक्षा सौ. सुलभाताई पिपरे, उपाध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, प्रभाकरराव भोयर, किशोर पंदिलवार, काशीनाथ सिंह, हनुमान काकडे, नंदु रणदिवे, राहुल संतोषवार, राजु बुद्धलवार आदी पदाधिकार्‍यांनी केले आहे.