Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेला आजपासून सुरुवात, कुठे पाहता येणार लाईव्ह? जाणून घ्या एकाच क्लिकवर
मंगळवार, सप्टेंबर ०९, २०२५
आशिया चषक २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबरपासून सुरूवात होत आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी झाले आहेत. या ८ संघांना दोन गटात समान विभागलं आहे. यापैकी पहिल्या गटात भारत, पाकिस्तान, ओमान आणि युएई हे संघ आहेत. तर दुसऱ्या गटात हाँगकाँग, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ आहेत.
स्पर्धेतील पहिला सामना हाँगकाँग आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा पहिला सामना अबूधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. रशीद खानच्या नेतृत्त्वाखाली अफगाणिस्तानचा संघ खेळणार आहे. तर हाँगकाँग संघाची यासिम मुर्तजा यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
आशिया चषक स्पर्धेतील सामने किती वाजता सुरू होणार?
आशिया चषक २०२५ सामन्याची वेळ बदलण्यात आली आहे. स्थानिक वेळेनुसार सुरूवातीला सामना ६ वाजता (भारतीय वेळेनुसार ७.३० वाजता) सुरू होणार होता. पण आता सामन्याची वेळ बदलण्यात आली असून सामन्याची वेळ अर्धा तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामागचं कारण म्हणजे दुबईमधील अतिउष्ण तापमानआहे. म्हणजेच आता आशिया चषकातील सामने भारतीय वेळेनुसार ८ वाजता सुरू होतील. तर ७.३० वाजता नाणेफेक होईल.
आशिया चषकातील सर्व सामने कुठे लाईव्ह पाहता येणार?
आशिया चषक २०२५ मधील सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नव्हे तर सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहेत. या सामन्यांचं लाईव्ह टेलिकास्ट सोनी लिव्ह ॲप किंवा वेबसाईटवर लाईव्ह पाहता येणार आहे. हे सामने पाहण्यासाठी सोनी लिव्ह ॲपचं सबस्क्रिप्शनदेखील खरेदी करावं लागणार आहे.
आशिया चषक २०२५चं संपूर्ण वेळापत्रक
९ सप्टेंबर (मंगळवार): अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग
१० सप्टेंबर (बुधवार): भारत विरुद्ध युएई
११ सप्टेंबर (गुरुवार): बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग
१२ सप्टेंबर (शुक्रवार): पाकिस्तान विरुद्ध ओमान
१३ सप्टेंबर (शनिवार): बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
१४ सप्टेंबर (रविवार): भारत विरुद्ध पाकिस्तान
१५ सप्टेंबर (सोमवार): श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग
१६ सप्टेंबर (मंगळवार): बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान
१७ सप्टेंबर (बुधवार): पाकिस्तान विरुद्ध युएई
१८ सप्टेंबर (गुरुवार): श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान
१९ सप्टेंबर (शुक्रवार): भारत विरुद्ध ओमान