चामोर्शी:- प्रधानमंत्री धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष व आदी कर्मयोगी अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत मौजा धर्मपूर चा पाच वर्षाचा सर्वांगीण विकास अआराखाडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सिंचन, सांस्कृतिक उपक्रम तसेच रोजगार निर्मितीसह गावातील प्रत्येक क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे.
आराखडा तयार करण्यापूर्वी ग्रामपंचायत सोमनपल्ली अंतर्गत येणाऱ्या धर्मपुर या गावातील शिवार फेरी घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायत पदाधिकारी, संबधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने या प्रक्रियेत सहभागी झाले.शाळा व अंगणवाडी दुरुस्ती, आरोग्य सुविधा, रस्ते व नाली बांधकाम, गोदाम उभारणी व इतर महत्वाच्या कामाचा समावेश आराखडा तयार करण्यात आला.
सरपंच श्री. नीलकंठ निखाडे यांनी सांगितले कि, हा पाच वर्षाचा विकास आराखडा प्रत्यक्षात टप्याटप्याने राबिवला जाईल. या कार्यक्रमात ग्रामपंचायत उपसरपंच, ग्रामपंचायत संपूर्ण सदस्य, गावातील आशाताई, अंगणवाडी सेविका व तसेच गावातील प्रतिष्टीत नागरिकं उपस्थित होते.
सरपंचानी सागितले कि, हा आराखडा गावाच्या दीर्घकालीन विकासासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आणि गावाचे नियोजन बदल विकास साधण्यास मोठी मदत होईल.
आधार न्युज नेटवर्क/ रितेश आसमवार चामोर्शी तालुका प्रतिनिधी