Sudhir mungantiwar: आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या तत्परतेमुळे नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांना मिळणार संगणकीकृत सातबारा!

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण (Computerization) न झाल्यामुळे त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. ही गंभीर समस्या भाजपा नेत्या अल्का आत्राम यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांचे संगणकीकृत सातबारा देण्याबाबत निर्देश दिले.


योजनेच्या लाभापासून शेतकरी वंचित:

नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचे संगणकीकृत सातबारे मिळत नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येत नव्हता. त्यामुळे या शिवारातील शेतकरी अनेक महत्त्वाच्या योजनांपासून वंचित राहत होते.


आमदार मुनगंटीवार यांची तत्परता:
भाजपा नेत्या अल्का आत्राम यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन या समस्येची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या अडचणी ऐकून मुनगंटीवार यांनी लगेचच जिल्हाधिकारी यांना सूचना केली आणि नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांचे सातबारा संगणकीकृत करून देण्यास सांगितले.

तहसीलदारांना निवेदन:

आमदार मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार, आज भाजपा नेत्या अल्का आत्राम आणि नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांनी पोंभुर्णा येथील तहसीलदार शेलवटकर यांना निवेदन दिले. या निवेदनात नवीन गंगापूर येथील शेतकऱ्यांचे सातबारा त्वरित संगणकीकृत करून देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.


निवेदन देताना उपस्थित:

यावेळी निवेदन देताना अल्का आत्राम (प्रदेश महामंत्री), नारायण बोंडे, मोरेश्वर राऊत, सुधाकर शिंदे, धनराज वाकूडकर, गिरीधर खेडेकर, किशोर पुप्पलवार, दिवाकर शिंदे, संजय मराठे, चिंतामणी खेडेकर, निलेश सातरे, केशव शिन्दे, रणपती वडस्कर, उमेश सिडाम आणि सर्व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे ही समस्या लवकर मार्गी लागेल अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.