BJP Join: चंद्रपूरच्या राजकारणात 'घरवापसी'! ब्रिजभूषण पाझारे यांचा भाजपमध्ये पुर्नप्रवेश

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या विरोधात बंडखोरी करून अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेले ब्रिजभूषण पाझारे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे.

चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ब्रिजभूषण पाझारे यांनी भाजपच्या अधिकृत उमेदवाराला आव्हान देत बंडखोरी केली होती. यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी निलंबन रद्द करत त्यांना पुन्हा पक्षात स्थान दिले आहे.

भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, माजी महानगराध्यक्ष राहुल पावडे, आणि माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला.

पाझारे हे भाजपमध्ये सक्रिय असलेले आणि मोठा जनाधार असलेले नेते मानले जातात. त्यांच्या बंडखोरीमुळे पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता त्यांचे पक्षात परत येणे, हे चंद्रपूरच्या भाजपसाठी बूस्टर ठरू शकते.