police Bharati महाराष्ट्र पोलीस भरती २०२५: अर्ज करायला 7 दिवसांची मुदतवाढ

Bhairav Diwase


मुंबई:- महाराष्ट्र पोलीस भरती २०२५ अंतर्गत १५,६३१ पदांसाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्यात आली आहे. इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आता ७ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.


गेल्या २९ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील १५,६३१ जागांसाठीच्या महत्त्वाकांक्षी भरती प्रक्रियेला आता ७ दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. या भरतीमध्ये पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ अशा विविध पदांचा समावेश आहे.


जिल्हा पोलीस दलाच्या वतीने सर्व इच्छूक उमेदवारांना आवाहन करण्यात आले आहे की, अर्ज भरण्यासाठी अंतिम क्षणाची वाट न पाहता त्वरित अर्ज सादर करावेत. महत्त्वाचे: अर्ज भरण्याची अंतिम तारीख आता ७ डिसेंबर २०२५ असेल.


पात्र उमेदवारांनी या महत्त्वपूर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत:
अर्ज करण्याची लिंक: https://policerecruitment2025.mahait.org/Forms/Home.aspx